(वृत्तांत,शंकर बरडे.)
हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल म्हणून वाळकेवाडी या गावाकडे पाहिले जाते त्याच गावात दोन सख्खे बहीण -भाऊ एकाच वेळी MBBS साठी पात्र झाल्याबद्दल सर्व समाजामध्ये त्यांचे कौतुक होतं आहे.
वाळकेवाडी गावचे रहिवासी तानाजी खिरोजी वाळके तशी यांची परिस्थिती जेमतेम गावातील सामान्य कुटुंब अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही पालकांची आपल्या मुलाला शिकवण्याची जिद्द पाहून खरंच त्या पालकाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
स्वप्निल व वैष्णवी यांच्या शिक्षणाची सुरुवात आपल्या गावातूनचं..जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकेवाडी या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर शासकीय आश्रम शाळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण करून त्यानंतर दोघे भाऊ बहीण एकत्र अभ्यास करत आपले ठरवलेले ध्येय जिद्द व चिकाटी डोळ्यात तेल घालून अभ्यास करत त्यांनी त्यांच्या स्वतःचे व आपल्या आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली मेहनत पाहता कौतुकास्पद आहे.
तशी त्यांची कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना देखील अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील MBBS साठी मुलगा चि. स्वप्निल तानाजी वाळके व मुलगी कु.वैष्णवी तानाजी वाळके यांचा अनुक्रमे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे प्रवेश निश्चित झाला आहे. दोघांचे हि केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले असून यांच्याकडून एक समाजामध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे..
त्यासोबतच बहीण भावाची शिकण्याची जिद्द आणि चिकाटी व प्रतिकूल परिस्थिती असतानाही ध्येयापासून विचलित न होता सतत अभ्यास करणे एकमेकांचा आधार देत दोन सख्खे बहीण-भाऊ एकत्र अभ्यास करत असल्यामुळे त्यांना एकमेकांना मानसिक आणि शैक्षणिक आधार मिळाला त्यात पालकांचे कष्ट: स्वतः हालअपेष्टा सहन करून मुलांच्या शिक्षणासाठी झटणारे पालक तानाजी खिरोजी वाळके यांचे योगदान यात सर्वात मोठे आहे…
हालखीच्या परिस्थितीवर मात करत दोन सख्या भावंडांनी मिळवलेलं हे यश खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे! गरिबी, अपुरेेे आर्थिक स्त्रोत आणि सोयी-सुविधांचा अभाव अशा अनेक अडचणींवर मात करूत स्वप्निल व वैष्णवी यांनी ‘एमबीबीएस’ (MBBS) सारख्या कठीण परीक्षेत पात्र ठरतात , तेव्हा तो संपूर्ण समाजासाठी एक आदर्श बनतो..
चौकट…
स्वप्निल व वैष्णवी यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या आपल्याला मिळालेले यश हे फक्त वडिलांचे कष्ट, त्यांचे बलिदान आणि त्यांनी कुटुंबासाठी घेतलेली मेहनत याला शब्दांत मांडणे कठीण आहे. स्वतःचे आयुष्य पणाला लावून आमच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या माझ्या वडिलांच्या मेहनतीला मानाचा मुजरा आणि सलाम!त्यांच्या या अपार कष्टाला समर्पित..
कुटुंबाचा आधारस्तंभ: स्वतःचे दुःख, थकवा बाजूला ठेवून घराला सुखाची सावली देणारा देवमाणूस म्हणजे वडील.न बोलता केलेले प्रेम: कधीही प्रेमाचा गाजावाजा न करता, मुलांच्या प्रत्येक गरजेसाठी स्वतःचे खिसे रिकामे करणारे वडीलच असतात.यशाचा पाया आज आपण जे काही आहोत, ते त्यांच्या पायाला पडलेल्या भेगा आणि घामाच्या थेंबांमुळेच आहोत.
“स्वतः जळाले पण आमच्या आयुष्यात प्रकाश केला,अशा माझ्या कष्टाळू वडिलांच्या मेहनतीला माझा कोटी कोटी सलाम!” 🙏
आम्ही जे आहोत ते आमच्या वडिलांमुळेच…
—–चि.स्वप्निल कु. वैष्णवी
