जि.प.प्राथमिक शाळा नखातेवाडीला शिक्षकांची दांडी, शाळा आठवडाभर बंद कुलूप…. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यबरोबर खेळण्याचा प्रकार….

किनवट तालुक्यातील मुळझरा ग्रामपंचायत अंतर्गत येणारी नखातेवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाच्या शिक्षणाकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले असून, २८ फेब्रुवारी २०२६ वार शनिवार या दिवशी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियान यांचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती शंकर बरडे व सुरेश डवरे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नखातेवाडी या ठिकाणी गेले असता शाळेला कुलूप दिसून आले त्या संदर्भात ग्रामस्थांशी विचारपूस केली की या शाळेला जवळपास गेल्या आठ दिवसापासून शिक्षकांची सतत दांडी आहे समग्र शिक्षा अभियान यांचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी आलेले साधन व्यक्ती यांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला विद्यार्थ्यांची शिक्षका संदर्भात विचारणा केली विद्यार्थ्यांकडून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे आठ दिवसापासून एकाही शिक्षकांची शाळेला उपस्थिती दिसून आली नाही अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याबरोबर खेळत असल्याचे दिसून आले किनवट तालुक्यातील भिसी केंद्रात अंतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नखातेवाडी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत असून एकूण १२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांकडून समजले समग्र शिक्षा अभियान यांचे सामाजिक अंकेक्षण दरम्यान शाळांना कुलूप दिसले. शाळेत शिक्षक तर नव्हतेच मात्र एकही विद्यार्थी शाळेच्या आजूबाजूला दिसला नाही. म्हणून साधन व्यक्ती यांनी ग्रामस्थांकडे चौकशी केली असता, शाळा नेहमीच बंद राहत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.मी भला न माझा पगार भला सुट्टी मिळाली तर घरी आराम करा ” अशा मानसिकतेतून काम करणार्‍या शिक्षकांविरोधात संताप व्यक्त होत आहे.यात चूक कोणाची? कारण शाळेच्या दिवशी शाळेला कुलूप , जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा शिक्षकांसाठी आदेश आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.यामुळे किमान आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्या आदिवासी विद्यार्थ्यांमुळे होतो अशा आदिवासी भागातील शिक्षकांनी तरी शाळेत उपस्थित राहावे तशी माफक अपेक्षा आहे असतांना शिक्षक आपल्या मनमानी शाळा सुरू असून, शाळेत उशिराने येणे, शाळेतून लवकर निघून जाणे, असे गंभीर प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्याचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान झाले आहे. त्यातच जिल्हा परिषद शाळांना शिक्षकांची दांडी, शाळेत उशिरा येणे, लवकर जाणे, यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भीशी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद नखातेवाडी ही शाळा येतं असून या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण दंतुलवाड हे आहेत त्यांना सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी आलेले साधन व्यक्ती शंकर बरडे त्यांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांच्याकडून इतर काही शैक्षणिक कामासाठी आदेश काढला असे सांगण्यात आले त्यामुळे मी शाळेत राहू शकत नाही असे उडवा उडवी चे उत्तर मिळाले विद्यार्थी वाऱ्यावर सोडून इतर कामासाठी शिक्षकांचा आदेश कसा काढला कसा.?याची सकोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करणे अपेक्षित आहे.या तालुक्यातील शेवटच्या टोकाकडे शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतरी शिक्षणामुळे अनेक पिढ्या वाईट होतील, शिक्षकच अधिक दांड्यामारीत आहेत. हा शैक्षणिक मुद्दा गांभिर्याने घ्यावा लागेल संबंधित शाळेसंदर्भात शिक्षकांची चौकशी करून योग्य ती कारवाई करणे सरपंचासह ग्रामस्थांची मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *