कै.श्रीधरराव देशमुख विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न..

सोनारी फाटा.

हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील कै.श्रीधरराव देशमुख विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा भव्य व दिमाखदार सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.

या समारंभात शाळेचे माजी विद्यार्थी श्री. विजय धोबे (सहशिक्षक) यांची केंद्रप्रमुख पदावर निवड झाल्याबद्दल तसेच श्री. रोहित बिचेवार यांची नांदेड पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री गजाननराव सूर्यवंशी सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले व उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. “कष्ट, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यामुळे यश नक्की मिळते, असा संदेश यावेळी देण्यात आला.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सूर्यवंशी सर, श्री. जाधव सर, श्री. कळसे सर, श्री. चव्हाण सर, श्री. सुरमवाड सर, श्री. भावडे सर, श्री. राऊतराव सर, श्री. कांबळे सर, श्री. ढेमकेवाड सर, श्री. शिरफुले सर, श्री. लोकरे सर, श्री. कदम सर, श्री. पवार सर तसेच मोरलवार मॅडम, वानखेडे मॅडम, शारदाबाई व इलियास मामा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले.कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. संपूर्ण समारंभ प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *