आत्मजोत जागृत करून मन घ्या हाती जीवन होईल सुंदर.. -वामन दादा इंगळे उदबोधन..

 

(शंकर बरडे, संपादक )

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चिंचोर्डी येथे श्री संत फुलाजी बाबा यांचा ११ वा वार्षिक सत्संग व अध्यात्मिक प्रवचन सोहळा संपन्न झाला. आत्मचिंतन व ध्यान करणे मनुष्यास सर्व सुख प्राप्त करून देणारा दिव्य मार्ग होय, ध्यानानाने ज्ञानाने नेत्र उघडतात, बुद्धी परिपक्व व तेज बनते ध्यान मार्गात मानव विकासाचे फार मोठे सामर्थ्य भरलेले आहे असा संदेश देऊन संत फुलाजी बाबांनी लोककल्यानासाठी देह झीजवला असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित, सिद्ध महयोग पीठ धर्मसेवा सिद्धेश्वर ट्रस्ट पटणापूर येथील प्रमुख अतिथी अध्यक्ष केशव दादा फुलाजीबाबा इंगळे यांनी केले.

अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करुन अंधश्रध्देपासून भक्तांना दूर करणारे खऱ्या मानव धर्माची ओळख देत सतमार्गाने जीवन जगण्याचा मंत्र देणारे संत फुलाजी बाबा यांचा वार्षिक सत्संग सोहळा महाराष्ट्रसह तेलंगणा व कर्नाटक या राज्यात सुद्धा केला जातो.

प्रत्येक वर्षी नचूकता चिंचोर्डी येथे वार्षिक सत्संग व अध्यात्मिक प्रवचन सोहळा पार पडतो आज मोठया संख्येने सतभक्तांसह संपन्न झाला

यावेळी ग्रंथपूजन व ध्यानधारणा विश्वबर वानोळे यांनी केली.प्रवचन व मार्गदर्शन,डॉ. मारोती वाकोडे (मनस्वी हॉस्पिटल हिमायतनगर, संचालक )दादाराव महागाडे, तरटे महाराजव या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. जि. प. सदस्य सत्यव्रत ढोले, जनार्दन फोले,विजय डवरे, अभिषेक खूपसे,परसराम ढाले

पॅंचेकोशोतील सर्व गावातील फक्त गण उपस्थित होते.उपस्थिती सर्व भक्त गण व संस्थान अध्यक्ष यांचे कार्यक्रमाचे आयोजक सरपंच गंगाराम ढोले,उपसरपंच संदीप झळके,यांना आभार म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *