Diwali Lantern

मांजरम येथे आज पासून नव्याने आठवडी बाजाराला सुरवात. -मांजरमकरासह परिसरातील ग्रामस्थांना मिळणार ताज्या भाज्या

*नायगांव/विलास शिंदे*

 

नायगाव तालुक्यातील सर्वात मोठी मानली जाणारी ग्रामपंचायत व कृषी प्रधान गाव म्हणजे मांजरमकडे प्रामुख्याने पाहिले जाते, हेच गाव आज पासून विकासाच्या नवीन उंबरवठ्यावर आले आहे.

गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून दर रविवारी आठवडी बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज दि, १९ ऑक्टोबर रोजी या बाजाराचा सुभारंभ श्री, गुरु १०८ महंत यदुबन महाराज कोळंबीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव ज्या गावची लोकसंख्या १२००० च्या पुढे आहे या गावात आठवडी बाजार दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आजच्या दिवशी गावचे युवा समाजकार्य करणारे भास्कर पाटील गायकवाडसह ग्रामस्थ व ग्रामपंचायत मांजरमच्या सर्व टीमच्या माध्यमातून सुंदर असा आठवडी बाजार आज रोजी भरला,अनेक व्यापाऱ्यांनी आपले स्टॉल लावून आपली विक्री,आपल्या स्टॉल वरून केली, गावकऱ्यांनी व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील महिला भगिनींनी या बाजारात येऊन अतिशय सुंदर अशी खरेदी केली व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व प्रत्येक बंधू-भगिनीच्या मुखातून एकच भावना व्यक्त होत होत्या की स्वच्छ व सुंदर फळभाज्या पालेभाज्या या बाजारातून आपल्याला खायला मिळतील व आपल्या गावचा विकास होईल व गावची बाजारपेठ वाढेल हा बाजार यापुढेहीदर रविवारी मांजरम येथील बस स्थानकाजवळ भरणार आहे त्यासाठी अजून व्यापाऱ्यांनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा…*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *