हिमायतनगर :- मागील काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत झाली त्यामध्ये सरसम जि.प सर्कल हे अनुसूचित जमाती प्रवर्गाला राखीव सुटल्यामुळे अनेक जन गुडाघ्याला बासिंग बांधून बसलेले पाहायला मिळत आहे, मात्र चिंचोर्डी येथील सरपंच गंगाराम ढोले यांच्या पत्नी महानंदा गंगाराम ढोले व एकघरीचे विद्यमान सरपंच सुनिल शिरडे यांच्या पत्नी ज्योतीताई सुनिल शिरडे या दोन नावांचा सरसम सर्कलमध्ये काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळेल असा बोल-बाला पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापू लागले आहे. एक नगरपंचायत, दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे. गावोगावी उमेदवारांच्या चर्चांना उधाण आले असून,त्याच सोबत सरसम जि. प सर्कल हे अनुसूचित जमाती महिला साठी राखीव सुटल्यामुळे सर्कलमधील आजी-माझी जि.सरपंच कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले पाहायला मिळत आहे तरी पण ज्योतीताई शिरडे व महानंदा ढोले यांच्या नावाची चर्चा सर्कल मध्ये काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळेल अशी होतांना पाहायला मिळत आहे.
“कोणाची फिल्डिंग कशी चालली.?”, कोण निवडून येईल.?
कोणता पक्ष कोणती राजकीय खेळी खेळणार.?
या प्रश्नांवर गावातील राजकारणात सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. वाड्यावर-वस्तीवर, पारावर, चौकाचौकात राजकारणाच्याच चर्चा सुरू असून, गावागावात निवडणुकीची चाहूल लागली आहे.
- पक्षांतर्गत तणाव आणि गटबाजीचे राजकारण पुन्हा डोकावू लागले आहे. काही ठिकाणी जुन्या गटांमध्ये समेटाचे प्रयत्न सुरू असून, काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना पुढे आणण्याचा विचार पक्षांतर्गत सुरू आहे. तर अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये “मात किंवा घात” अशी चुरस दिसून येते पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या निवडणुकीच्या रणशिंगाच्या तयारीत हिमायत्तनगर तालुका सज्ज झाला आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारांच्या घोषणा आणि गटबाजीतील बदल पाहायला मिळणार असून, राजकीय समीकरणांचे नवे चित्र उभे राहील अशी चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे. सद्या तरी कोणत्याही पक्षांनी युतीची भूमिका अधिकृतरित्या स्पष्ट केलेली नाही, निवडणुका या स्वबळावर होणार का युतीमध्ये होणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल, पण पडद्यामागे सर्व ठरले असल्याची कुजबूज सुरू आहे परंतु तोवर मात्र इच्छुक उमेदवारांची मनात घालमेल सुरू आहे हे मात्र तितकेच खरे… सोशल मीडियात मात्र “भावी” च्या बॅनरबाजीने नुसता धुमाकूळ घातला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे..