(संपादक शंकर बरडे )
हिमायतनगर:तालुक्यातील आदिवासी बहुल असलेले वाळकेवाडी हे गाव गावात जवळपास ७० टक्के सामाज मोल मजुरीवर अवलंबून आहे.त्यात- त्यात सद्याची परिस्थिती ही अतिशय हलाकीची असून अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी तर हतबल झालाच त्या सोबत मजुरीवर्ग यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते सुद्धा चिंतेच्या अवस्थेत आहे.
गोर गरीब लोकांना, मोलमजुरी करून उपासमारीची वेळ आली असल्याने आज सर्व राज्यांत गरजवंताना दातृत्वाचा आधार देणारे लोक बाहेर पडून कोठे अन्न धान्य, तर कोठे जेवन, उपहार देउन त्यांची भुक भागवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यात हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील अतिशय गरीब लोकांना व गरजवंताना दातृत्वाचा आधार देणारे महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती कोल्हापूर या संस्थेने हात पुढे करत गावातील काही गरजू लोकांना जीवनावश्यक ची किट वाटप करण्यात आले सदर किटमध्ये डाळ, तांदूळ, तेल, साखर चायपती,पोहासह शंगदाणा दिसून आले.
या वेळी संस्थेचे प्रतिनिधी,शिक्षिका भिसे ताई, सर्व भिसे कुटूंबिय व ग्रामस्थ उपस्थित होते.शिक्षिका अस्मिता भिसे यांनी वाळकेवाडी गावातील नागरिकांच्या हस्ते या अन्न धान्य किटचे वाटप करतमहाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती कोल्हापूर यांचे राज्याध्यक्ष मा.श्री.भरत रसाळे यांचे आभार मानले.