(संपादक, शंकर बरडे )
भोकर तालुक्यातील जि. प शाळा आमदारी येथे दिनांक २१/१०/२०२५ जी.प. प्राथमिक शाळा आमदरी येथे मुलांना बॅगा वाटप करण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. *महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती कोल्हापूर* यांच्या अंतर्गत बॅगा शैक्षणिक साहित्य व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेती व पिकासहित जनावराचे मोठे नुकसान झाले. असून शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याने, जेव्हा बळीराजा संकटात सापडतो तेव्हा देशातील अर्थव्यवस्था कोलंबी जाते. त्यामुळे मुसळधार व अतिवृष्टीने शेतीचे नुकसान व सोबत जनावरांचे मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने शेतकरी हातभल झाला, असल्याने या मोठ्या संकटात आपल्या शेतकऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून *महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती कोल्हापूर* यांच्या विद्यमाने जी. प. प्राथमिक शाळा ,आमदरी येथील मुलांना शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी बॅगा वाटप करण्यात आल्या.महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे प्रतिनिधी गंगुताई(सौ.भिसे) उपस्थित होत्या.
गावातील वरिष्ठ मंडळी,शिक्षक व विद्यार्थी पालक व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
गावकऱ्यांनी आपल्या मनोगतातून समितीचे आभार व्यक्त केले.
आतापर्यंत आमचे विद्यार्थी प्लास्टिकची पिशवी,थैली किंवा हातात दप्तर घेऊन शाळेत येत होते.आज ह्या स्कूल बॅग आमच्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यात एक नवा आनंद व आत्मविश्वास निर्माण केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जळबाजी क्षिरसागर यांनी समितीचे राज्याध्यक्ष मा. भारत रसाळे सर यांचे आभार व्यक्त केले.