Diwali Lantern

संत फुलाजी बाबांनी लोककल्याणासाठी देह झिजवला – मा.आ. जवळगावकर यांचे उदबोधन

(संपादक, शंकर बरडे )

हिमायतनगर : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वाळकेवाडी येथे श्री संत फुलाजी बाबा यांचा ९ वा वार्षिक सत्संग व अध्यात्मिक प्रवचन सोहळा संपन्न झाला.
भक्तांना आत्मचिंतन व ध्यान करणे मनुष्यास सर्व सुख प्राप्त करून देणारा दिव्य मार्ग होय, ध्यानानाने ज्ञानाने नेत्र उघडतात, बुद्धी परिपक्व व तेज बनते ध्यान मार्गात मानव विकासाचे फार मोठे सामर्थ्य भरलेले आहे असा संदेश देऊन संत फुलाजी बाबांनी लोककल्यानासाठी देह झीजवला असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. माधवराव पाटील जळगावकर यांनी केले.

अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करुन अंधश्रध्देपासून भक्तांना दूर करणारे खऱ्या मानव धर्माची ओळख देत सतमार्गाने जीवन जगण्याचा मंत्र देणारे संत फुलाजी बाबा यांचा वार्षिक सत्संग सोहळा महाराष्ट्रसह तेलंगणा व कर्नाटक या राज्यात सुद्धा केला जातो.
त्या उक्तीप्रमाणे प्रत्येक वर्षी नचूकता वाळकेवाडी येथे वार्षिक सत्संग व अध्यात्मिक प्रवचन सोहळा पार पडतो आज मोठया संख्येने सतभक्तांसह संपन्न झाला
यावेळी ग्रंथपूजन व ध्यानधारणा जयवंत हुरदुके यांनी केली.
प्रवचन व मार्गदर्शन, धनराज सोनटक्के, विशाल वानोळे, शिवाजी गायकवाड, एकनाथ बुरकूले, पोटे सर, मारोती डुकरे, मा. आ. जवळगावकर साहेब यांनी केले व सर्वांचे आभार उपसरपंच संजय माझळकर यांनी मानले.
यावेळी उपस्थित, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, मा. जि.प सदस्य सुभाष राठोडसह पंचोकोशितील भाविक भक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थिती दर्शिवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *